Saturday, 7 June 2014

महाराष्ट्र दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल १० जून रोजीपुणे:राज्‍य माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक बोर्डातर्फे मार्च 2014 मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या दहावी परीक्षेचा निकाल दि. १० जून रोजी जाहीर करण्‍यात येणार आहे. त्‍याच दिवशी दुपारी एक वाजल्‍यापासून दहावीचा निकाल विद्यार्थ्‍यांना ऑनलाईन पाहता येणार असल्‍याची माहिती राज्‍य माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षक मंडळाच्‍यावतीने देण्‍यात आली.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्‍हापूर, मुंबई, लातूर, अमरावती व कोकण नऊ विभागांचा निकाल एकाचवेळी जाहीर करण्‍यात येणार आहे. कनिष्‍ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्‍यांच्‍या गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शवणारे शालेय अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळाच्‍यावतीने निकालानंतर करण्‍यात येईल. त्‍याचदिवशी विद्यार्थ्‍यांना गुणपत्रिकांचे वाटप महाविद्यालयात करण्‍यात येईल.

खालील संकेतस्थळावर १० जून रोजी बारावीचा रिझल्ट दुपारी १ वा. पासून तुम्हाला ऑनलाईन पाहता येणार आहे.

- ssc.maharesults.in

- maharesult.nic.in

- hscresult.mkcl.org

- rediff.com/exam

 

दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालासाठी शुभेच्छा...

इ.१० वी-महारिझल्ट टीम


0 comments:

Post a Comment