Tuesday, 10 June 2014

दहावीचा निकाल लांबणीवर : जूनच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता


"महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल जूनच्या तिसऱ्या आठवड्यात घोषित होण्याची शक्‍यता आहे. निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. ते पूर्ण होताच निकाल लागणार असल्याची माहिती बोर्डातील सूत्रांनी दिली. यानंतर दुसऱ्याच दिवशी अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे. 10 जूनला दहावीचा निकाल नसल्याचे कळविले. शिवाय पुढल्या आठवड्यात निकाल येण्याची शक्‍यता वर्तविली."- Esakal.Com

"अद्यापही राज्य मंडळाकडे सर्व विभागांचे निकाल आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या हाती पडणाऱ्या निकालात त्रुटी राहू नयेत, यासाठी मंडळातील कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. प्रवेशपत्रांचा गोंधळ आणि निवडणुकांमुळे उशिरा सुरू झालेले मूल्यांकन यामुळे या वर्षी निकाल लांबल्याची चर्चा आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्याच्या तोंडावर निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य मंडळाच्या अध्यक्षांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही."-Loksatta.Com

"सुप्रीम कोर्टाने निकालासंदर्भात दिलेली सूचना आणि लोकसभा निवडणुकीच्या पोर्शभूीवर दहावीच्या निकालांवर कोणताही परिणाम होणार नाही, हा बोर्डाचा दावा फोल ठरल्याचे स्पष्ट होत आहे. जूनचा पहिला आठवडा संपला तरी दहावी निकालाची तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांध्ये संभ्राचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाची प्रक्रियाही लांबणीवर पडण्याचे संकेत दिसू लागले आहेत."-LokPatra.In

"यंदा दहावीचा निकाल `लटकल्या`मुळे पुढील प्रवेशप्रक्रियेचाही `फज्जा` उडण्याची शक्यता आहे दिसून येत आहे. करीअरची दिशा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा असणार्‍या दहावीची दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा होते. यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करते. मात्र, अद्याप निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. डोळे लावून बसलेल्या पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. "-Zee24Taas.Com

0 comments:

Post a Comment