Friday, 13 June 2014

दहावीच्या विद्यार्थ्यांचा पुढील उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा.१७ जून रोजी होणार निकाल जाहीर


Maharashtra SSC Result 2014 | Result is on 17 June say Maharashtra Board
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा यंदाचा दहावीचा निकाल १७ जून २०१४ रोजी जाहीर होईल असा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे.गतवर्षी ७ जून रोजी दहावीचा निकाल लागला होता.या वर्षी काही तांत्रिक बाबींमुळे निकाल लावण्यास महाराष्ट्र बोर्डाने वेळ घेतल्याने, अखेर आज "मंडळातर्फे १७ जून रोजी निकाल जाहीर होणार" याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली.

खरे तर दहावीचा निकाल १० जून पूर्वीच बोर्डाने लावायला हवा होता.असो! या निकालाकडे अनेक दहावीचे विद्यार्थी आणि त्याचे पालक डोळे लावून बसले होते.त्यातच सोशल मेडियावर रोज निकालाबाबत अफवा पसरत होता.त्यामुळे निकाल नक्की कधी लागणार याकडे सर्वाचे लक्ष होते त्यातच महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे काहीच माहीती न मिळाल्यामुळे बहुतांशी जणांचा जीव टांगणीला लागला होता.अखेर बोर्डाने आज निकाल ७ तारखेला मंडळाच्या वेबसाईटवर तसेच अन्य वेबसाईटवर १७ जून रोजी जाहीर करू अशी अधिकृत बातमी देऊन दहावीच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला आहे.


या वर्षी बारावीचा निकालही २ जूनला म्हणजेच बराच लांबला आहे. लोकसभा निवडणूकांमुळे निकाल लांबल्याचे समजते आहे.सदरील दहावीचा हा निकाल ' बेस्ट ऑफ फाइव्ह ' च्या सूत्रानुसारच लागणार आहे. बारावीचा निकाल बोर्डानं तडकाफडकी जाहीर केल्यानंतर, दहावी निकालाच्या तारखेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.


विद्यार्थी जीवनातील पहिला मैलाचा दगड समजल्या जाणाऱ्य़ा दहावीच्य़ा निकालाची तारीख जाहीर झाली आहे. मंगळवार, दिनांक 17 जून रोजी वेबसाईटवरून दहावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात शालान्त विभागाच्या म्हणजेच दहावीच्या परिक्षा घेण्यात आल्य़ा होत्या.


गेल्या अनेक दिवसापासून दहावीचे विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत होते. मात्र आता त्य़ांची प्रतिक्षा संपली आहे. मंगळवार, दिनांक 17 जून रोजी दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थी वेबसाइटवर आपला निकाल पाहू शकतील. तर, २७ जूनला दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या शाळांमध्ये गुणपत्रिका मिळेल, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षांनी दिली.मंगळवारी , १७ जूनला दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना खालील वेबसाइटवरून आपला निकाल पाहता येईल. शिवाय बीएसएनएलच्या मोबाइलवरूनही विद्यार्थ्यांना आपला निकाल एसएमएसद्वारे मिळवता येणार आहे.विद्यार्थ्यांनी MHSSC (space) Seat No. टाईप करून ५७७६६ या क्रमांकावर एसएमएस केल्यास एक रुपयांत त्यांना आपला निकाल उपलब्ध होऊ शकेल.

विद्यार्थ्यांना आपला निकाल पुढील वेबसाईट पाहता येईल.

- ssc.maharesults.in

0 comments:

Post a Comment