Tuesday, 20 May 2014

असा करा बारावीचा अभ्यास : प्रा.शिरीष आपटेआयआयटीला जायचं तर जेईई द्यायलाच हवी. पण या परीक्षेचा अभ्यास नेमका कसा करायचा? कोणती पुस्तकं वापरायची?हेच अनेकांना माहिती नसतं. त्यांच्याचसाठी... 


विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मागील लेखात आपण जेईई संबंधित सर्व 'मानसिक' शंकांची उत्तरे मिळविली. ती सर्व सकारात्मक होती. या लेखाच्या सुरुवातीला त्याची दुसरी वास्तव बाजू पाहू. यावर्षी जेईई मेनचा निकष ११५ / ३६० म्हणजे ३२% होता. तरीही फक्त ४% जण जेईई(अॅडव्हान्स) साठी उत्तीर्ण झाले. आता त्यातील किती जण अॅडव्हान्स पास होतील आणि १२वी बोर्डाच्या परीक्षेत पहिल्या १५% विद्यार्थ्यात येऊन प्रत्यक्ष आयआयटीला जातील याचा विचार करा. आपण खरोखरच आयआयटी मटेरिअल आहोत का याचा विचार करून निर्णय घ्या. त्यापेक्षा इ. बारावीचे पीसीएमचे गुण आणि जेईई(मेन) चे गुण यांच्या बेरजेवर मिळणाऱ्या प्रवेशावर लक्ष द्या. बारावी पीसीएममध्ये ९०% पेक्षा जास्त गुण मिळाले तर जेईई(मेन) मध्ये कमी गुण मिळाले तरी तुम्हाला चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये प्रवेश मिळू शकतो. जे विद्यार्थी विद्यार्थिनी आज बारावीत आहेत त्यांनी सर्व प्रथम ऑगस्ट महिन्यापर्यंत इ. अकरावीच्या अभ्यासक्रमाची उजळणी करावी ही माझी पहिली आणि सर्वात महत्वाची सूचना आहे. त्यातही इ. बारावीचे जे धडे इ. अकरावीच्या धड्यांमधील संकल्पनांवर आधारित आहेत. (उदा: physics मध्ये Electrostatics, Mathsमध्ये Derivatives, Integration ) त्यांची अधिक सखोल तयारी करावी. या तयारीत, सर्व व्याख्या, नियम समजावून घेणं. सर्व फॉर्म्युले, त्यातून मिळणाऱ्या भौतिक राशीच्या एककासह पाठ करणं आणि त्यावर आधारित गणिते आणि बहुपर्यायी प्रश्न (Multiple Choice Questions) सोडवणं, याचा समावेश असावा. यासाठी बोर्डाच्या पाठ्यपुस्तकासोबत सीबीएससीची पाठ्यपुस्तकं (विशेषत: गणितांसाठी)आणि अन्य संदर्भग्रंथ (संकल्पना समजावून घेण्यासाठी) यांचा वापर करावा. भरपूर शंका विचाराव्यात, प्रयोग करावेत आणि सर्वंकष तयारी करावी. 

महाराष्ट्र राज्य बारावी बोर्डाचा निकाल होणार ३० मे २०१४ ला जाहीर


सप्टेंबर महिन्यापासून इ. बारावीची बोर्डाची आणि जेईईची तयारी समांतर पध्दतीने करावी म्हणजे एक धडा घेऊन त्याची आधी बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी तयारी करावी आणि लगेच त्यावरील किमान ६० बहुपर्यायी प्रश्न सोडवावेत. यात गणितं सोडवण्यावर विशेष भर द्यावा. बोर्डाच्या परीक्षेत २६ गुणांची गणितं येतात. यात १२ गुणांची गणितं अनिवार्य असतात. बोर्डाच्या परीक्षेत विचारली जाऊ शकतील अशी गणितं जेईईमध्ये बहुपर्यायी प्रश्न म्हणूनसुद्धा येतात. गणितं सोडवण्याच्या सरावामुळे तुमची आकडेमोड किंवा गणन करण्याची क्षमता वाढते. या सर्वामुळे तुमचा जेईईला फायदा होतो. दीर्घोत्तरे प्रश्न लिहून सोडवावेत म्हणजे त्यांना सोडवायला किती वेळ लागतो याचा अंदाज येतो आणि त्याप्रमाणे बोर्डाची परीक्षा देताना वेळेचं नियोजन करता येतं किंवा प्रश्नांची निवड करणं सोपं जातं. मग त्या घड्यावरील बहुपर्यायी प्रश्न सोडवावेत. यासाठी पुष्कळ पुस्तकं उपलब्ध आहेत. संबधित शिक्षकांना विचारून प्रत्येक विषयाचं किमान एक पुस्तक विकत आणावं आणि त्यातील प्रश्न सोडवावेत. यासाठी ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या वेबसाइटचा उपयोग अधिक चांगला होतो. यात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि त्याचे सविस्तर सोल्युशन तर असतंच, पण तेसुद्धा समजले नाही तर शंका विचारून ते समजावू‌न घ्यायची सोय असते जे पुस्तक वापरताना शक्य होत नाही. अशी तयारी करून १५ डिसेंबर पर्यंत आपण बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण करावा. 

*वरील लेख हा अपूर्ण असून.पूर्ण लेख महाराष्ट्र टाईम्सच्या या लिंक वर तुम्हाला वाचायला मिळेल. 

सौजन्य : महाराष्ट्र टाइम्स [मूळ लिंक] - लेख माहितीस्तव प्रदर्शित

अधिक माहितीसाठी : म.टा. च्या अधिकृत संकेतस्थळ (http://maharashtratimes.indiatimes.com) येथे भेट द्या.


0 comments:

Post a Comment